पारनेर तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात

सनी सोनावळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

टाकळी ढोकेश्वर - अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात झाली असुन, पारनेर तालुक्यातील 39 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे 

टाकळी ढोकेश्वर - अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात झाली असुन, पारनेर तालुक्यातील 39 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे 

या गावांमध्ये आपले गाव 'पाणीदार' करण्यासाठी ग्रामस्थ सामुहिक श्रमदान करत आहेत. भविष्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे मात्र पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रिचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेमुळे गावकऱ्यांनी जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. या स्पर्धेचे विजेते पद  पटकीवण्याचा तालुक्यातील पुणेवाडी व नांदुर पठार यांसह अन्य गावांनी जणु निश्चयच केला आहे.

पारनेर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता नेहमीच जाणवते मात्र जलयुक्त शिवार व या वर्षापासुन पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेमुळे जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात उभी राहतील आणि पाण्याची पातळी निश्चित वाढणार आहे. ही स्पर्धा आता लोकचळवळ होत आहे. सरकार आणि सेवाभावी संघटनांचा मदतीचा हात यामुळे गाव पाणीदार करण्याच्या या मोहिमेला आणखी गती मिळत आहे. पुणेवाडी येथेही गावातील सर्वच ग्रामस्थांनी भर उन्हात रविवारी या योजनेत सहभाग घेऊन माथ्यापासुन ते पायथ्यापर्यंत श्रमदानास सुरवात केली आहे. नांदुर पठार येथे सकाळी सहा वाजल्यापासुन गावकरी टिकाव, खोरी घेऊन गाव पाणीदार करण्यासाठी घरातुन बाहेर पडले.

आपले दोन हात असले की कोणत्याही मशीनची गरज लागत याची प्रचिती गावकऱ्यांनी आली असल्याचे पाणी फाऊंडेशनचे शरद घणवट यांनी सांगितले.

Web Title: Satyamev Jayate Water Cup Tournament begins in Parner taluka