सौंदत्ती रेणुका देवी मंदिर दर्शनासाठी खुले; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रेणुका देवी मंदिरसह जिल्ह्यातील नऊ मंदिरे दर्शनासाठी खुली
Saundatti Shri Renuka Devi Temple
Saundatti Shri Renuka Devi TempleEsakal

बेळगाव : सौंदत्ती (Saundatti )श्री रेणुका देवी मंदिर (Renuka Devi Temple) भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ (Mahantesh Hiremath) यांनी सोमवारी (ता. ३१) घेतला. रेणुका देवी मंदिरसह जिल्ह्यातील नऊ मंदिरे दर्शनासाठी खुली झाली आहेत.

शासनाने कोरोना (Corona) संबंधीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी आज मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याचा आदेश बजावला. त्यामुळे भाविकांच्या दर्शनाचा मार्ग अखेर खुला झाला असून त्याची अमलबजावणी देखील आजपासून करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी ६ जानेवारी रोजी आदेश बजावत रेणुका मंदिरसह जोगनभावी येथील सत्यम्मा देवी मंदीर, विरभद्र देवस्थान गोडची रामदुर्ग, चिंचली मायाक्का देवी मंदिर, पंत महाराज मंदिर पंत बाळेकुंद्री, होळेम्मा देवी मंदिर बडकुंद्री, मल्लय्या देवस्थान मंगसुळी, बसवेश्वर देवस्थान खेडेगाव, रेणुका देवस्थान कोकटनूर अथणी ही मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. आता ही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत.

बेळगावसह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोनचे संकट वाढल्याने राज्य सरकारने ४ जानेवारी रोजी नवे कडक निर्बंध लागू केले होते. यात रात्रीच्या कर्फ्यूसह विकेंड कर्फ्यूचा देखील समावेश होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. १७ जानेवारीला होणारी सौंदत्ती रेणुका देवी यात्रा रद्द झाली होती. शासनाने आता नियम शिथिल केल्याने मंदिरे देखील दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान, सौंदत्ती मागील काही दिवस मंदिर जरी बंद असले तरी परंपरेनुसार भाविक रोज सामूहिकरित्या डोंगरावर जात होते. डोंगराच्या पायथ्याशी जोगणभाव परिसरात देवीची सामूहिक पडली भरली जात होती. पण आता देवीचे दर्शन खुले करण्यात आल्याने भाविकांचा दर्शनाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

  • मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर लादण्यात आलेल्या अटी :

  • मंदिर आणि मंदिर परिसरात यात्रा, विशेष कार्यक्रम, लोकांची गर्दी होईल असे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत.

  • दर्शनासाठी सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापर सक्तीचा.

  • एकावेळी केवळ ५० लोक एकाच ठिकाणी येऊ शकतात. पण त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.

  • मंदिरात प्रवेश देणारा थर्मल स्क्रिनिंग होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com