Sangli : बेघरांची वारी; पांडुरंगाच्या दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli : बेघरांची वारी; पांडुरंगाच्या दारी

Sangli : बेघरांची वारी; पांडुरंगाच्या दारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : अनाथांचा नाथ म्हणून विठूरायाकडे पाहिले जाते. त्याची पुजा म्हणजे मानवता, हा सहजधर्म. मानवतेच्या दृष्टीने येथे सुरू असलेल्या सावली बेघर निवारा केंद्रात विठ्ठल हा मनोभावे पुजला जातो. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने केंद्रातील तीसहुन अधिक बेघरांनी साक्षात विठ्ठलाची आराधना करून पायी दिंडी काढली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, भगवे झेंडे, डोक्यावर पांढरी टोपी, ओठी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत निघालेली ही दिंडी जणू त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनालाच निघाल्याचे चित्र होते.

हेही वाचा: VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

येथील आपटा पोलिस चौकी जवळ महापालिका आणि इन्साफ फौंडेशनतर्फे सावली बेघर निवारा केंद्र चालविले जाते. त्याठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या सत्तरवर जणांना हक्काचा निवारा दिला जातो. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांच्या पुढाकारातून याठिकाणी सर्व सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. आज कार्तिकी एकादशीनिमित्त केंद्रातील तीसहुन अधिक जणांना पारंपारीक पोषाख परिदान करण्यात आला. हाती भगवे झेंडे आणि टाळ देण्यात आली. डोक्यावर तुळी वृंदावन घेवून विठूरायाचा जयघोष करून केंद्रातून ही दिंडी सुरू झाली.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार: आरोपी अनिल बोंडेंसह इतर भाजप नेत्यांना जामीन मंजूर

काँग्रेस भवन जवळून प्रबोधनकार ठाकरे चौकात ही दिंडी आली. बेघरांना काढलेल्या या दिंडीचे अनेक कुतुबल व्यक्त केले. विठ्ठलाच्या जयघोषाने सारा परिसरात दणाणून गेला होता. दिंडीचे आयोजन रफीक मुजावर, रेहमत मुजावर, निखील शिंदे, वंदना काळेल, मंदार शिंपी, अमोल कदम यांनी केले.

loading image
go to top