esakal | म्हणे..काळ्यादिनाला यंदा परवानगी नाही; बेळगाव जिल्हाधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

म्हणे..काळ्यादिनाला यंदा परवानगी नाही; बेळगाव जिल्हाधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी प्रशासनातर्फे सुरुच असून, दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बेळगावसह सीमाभागामध्ये मराठी भाषक काळादिन पाळतात. त्याला यंदा परवानगी देण्यात येणार नाही, अशी दर्पोर्क्ती प्रशासनाकडून करण्यात आली. पण राज्योत्सव कोविड-१९ नियमावलीप्रमाणे साजरा करण्यास परवानगी मिळेल, असा अजब निर्णय घेत मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.12) राज्योत्सव पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बोलत होते. बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रामध्ये सामील व्हावीत, या मागणीसाठी मागील सहा दशकापासून सीमाभागातील मराठी भाषक लढतोय आहे. शिवाय त्याचाच भाग म्हणून दरवर्षी एक नोव्हेंबरला काळादिन पाळत केंद्राचा निषेध नोंदविला जातो.

त्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होऊन लढ्याला बळ देतात. लोकशाही पध्दतीने आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यावर आता टाच आणण्याची भुमिका घेतली जात आहे. मराठी भाषिकांच्या लढ्याची गळचेपी सुरु आहे. येत्या १ नोव्हेंबरला काळ्यादिनी काढण्यात येणारी मूक फेरीला कोणत्याही कारणाखाली परवानगी मिळणार नाही, अशी दर्पोक्ती करण्यात आली आहे. परंतु, राज्योत्सवाला सरकारच्या नियमावलीचे पालन करून उत्सव साजराला परवानगी देण्यात येईल, असे सांगून मराठी भाषिकांना डिवचण्यात आले आहे.

हेही वाचा: निवडणूक शपथपत्र : फडणवीसांविरोधात तक्रार, साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात ८४ टक्के लसीकरण

गेल्यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. ८४% लसीकरण झाले आहे आणि कोरोनाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. पण पूर्ण पणे गेलेले नाही. सध्या जिल्ह्यात संक्रमणाचे प्रमाण ०.०३ टक्के आहे. प्रत्येकाने कोविड लस घ्यावी. यावेळी पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांनी राज्योत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले.

बैठक राज्योत्सवाची अन् चर्चा काळ्यादिनाची

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्योत्सव पूर्वतयारी बैठक आयोजिली होती. पण, त्याठिकणी चर्ची काळ्यादिनाची होती. कन्नड संघटना व कार्यकर्त्यांकडून मराठी भाषिकांची गळचेपी आणि त्यांचा प्रभाव कसा कमी करता येईल, याबाबतचेच सल्ले अधिक बैठकीत दिल्याचे दिसले. तसेच बैठकीत कन्नड भाषेच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, शहराचे सौंदर्यीकरण केले जावे, सरकारी कार्यालयांवर कन्नड ध्वज उभारण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती करताना राज्योत्सवदिनी महाराष्ट्र एकीकरण समितीला काळादिन पाळण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी अजब मागणी बैठकीत कार्यकर्त्यांकडून केली जात होती.

यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, बेळगावचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगन्नावर, कन्नड आणि संस्कृती विभागाचे सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री उपस्थित होते.

loading image
go to top