सांगलीत एन 95 मास्कची टंचाई 

n 95 mask.jpg
n 95 mask.jpg

सांगली-रुग्णांवर उपचार करताना लागणाऱ्या एन 95 मास्कची बाजारात मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे डॉक्‍टरांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सांगली आयएमएने कोल्हापूरहून हे मास्क उपलब्ध करुन आपल्या सदस्यांना वाटप केले. मात्र अजून या मास्कची मोठ्या प्रमाणात गरज आहे. 


एन 95 मास्क हे विशेष करुन डॉक्‍टर वापरतात. रुग्णांवर उपचार करताना या मास्कची गरज असते. यातून विषाणू संसर्ग सहज होत नाही. साध्या मास्कमधूनही विषाणू संसर्ग लगेच होत नाही. मात्र रुग्णांवर उपचार करताना रुग्णांच्या संपर्कात बराचवेळ रहावे लागत असल्याने त्यासाठी एन 95 हे मास्क जास्त उपयोगी आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांसाठी या मास्कची गरज आहे. 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर बाजारात सामान्य नागरिकांनीही एन 95 मास्कची खरेदी केली. त्यामुळे या मास्कची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. आता डॉक्‍टरांना हे मास्क मिळणे अवघड झाले आहे. 


सांगलीच्या बाजारपेठेत हे मास्क मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्‍टरांना उपचारावेळी साधे मास्क वापरण्याची वेळ आली आहे. सांगली आयएमएने आपल्या सदस्यांसाठी कोल्हापूरमधून हे मास्क उपलब्ध केले आहेत. अध्यक्ष डॉ. रणजितसिंह जाधव म्हणाले, एन 95 मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधून काही मास्क मिळाले. ते थोड्याच सदस्यांना देता आले. आता कोल्हापूरमध्येही या मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. 


एन 95 मास्क गुजरातमधून येतात. परंतू लॉकडाऊनमुळे सध्या हे मास्कही येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे काही दिवस वाट पहावी लागणार आहे. कोरोनाचा सांगली जिल्ह्यात प्रसार वाढू लागला तर येणारा रुग्ण कोरोना बाधितांच्या संपर्कात आला किंवा नाही याची माहिती नसल्याने डॉक्‍टरांना सामान्य नागरिकांवर उपचार करतानाही या मास्कची गरज भासणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com