स्कूल बस, रिक्षा हव्यात फिट

राजेश मोरे
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर - दोन-चार पैशांकडे न पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे आता शाळेबरोबरच पालकांनीही दक्ष राहण्याची वेळ आली आहे. स्कूल बसह विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा ‘फिटनेस’ ही बाबही महत्त्वाची बनली आहे. 

कोल्हापूर - दोन-चार पैशांकडे न पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे आता शाळेबरोबरच पालकांनीही दक्ष राहण्याची वेळ आली आहे. स्कूल बसह विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा ‘फिटनेस’ ही बाबही महत्त्वाची बनली आहे. 

स्पर्धेच्या युगात आपला मुलगा पाठीमागे राहू नये, यासाठी पालक चांगल्या शाळेची निवड करतात. त्याच्या ‘फी’चाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही. शिकवणीसाठीही त्यांच्याकडून तडजोड केली जात नाही; मात्र चार पैसे वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष होते. स्कूल बसबाबतचे नियम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घालून दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. स्कूल बस फीट ठेवण्याची जबाबदारी शाळेची आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दरवर्षी मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत स्कूल बसची मोफत तपासणी केली जाते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांबाबत शाळेंकडून शक्‍यतो चालकाचे नाव, वाहन चालविण्याचा परवाना, परमिट पाहिले जाते. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षातून किती विद्यार्थी प्रवास करतात, ते नियमाला धरून आहे की नाही, हे मात्र पाहिले जात नाही. दूर अंतरावरील मुलांना स्कूल बस व रिक्षातून आणताना वेळेचे नियोजन करताना चालकांकडून नियमांचे उल्लंघन होते. परिणामी अपघाताचे प्रसंग घडतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून प्रवासी विद्यार्थ्यांचा अपघाती विमाही शक्‍यता उतरवला गेलेला नसतो.

स्कूल बसच्या मोफत तपासणीकडेही अनेक शाळांनी पाठ फिरवली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर त्याबाबत शाळांनी दक्ष राहून तक्रारी द्याव्यात. 
- डॉ. स्टीव्हन अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

दृष्टिक्षेपात
 जिल्ह्यातील स्कूल बस - ७३७
 तपासणी झालेल्या बस - ५३७
 कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या शाळा - ४७

स्कूल बसबाबतचे नियम 
 बसचा रंग पिवळा, त्यावर शाळेचे नाव 
 पुढील व मागील बाजूस ‘स्कूल बस’ लिहिणे आवश्‍यक
 स्पीड गव्हर्नर ५० किलोमीटर
 खिडकीखाली सर्व बाजूंनी १५० मिलिमीटर विटकरी रंगाचा पट्टा हवा
 पायऱ्यासोबत हाताला धरावयाचा दांडा
 खिडक्‍यांना तीन स्टीलचे दांडे 
 प्रथमोपचार पेटी, अग्निशामके
 प्रशिक्षित चालक, पुरुष व महिला परिचर

Web Title: school bus rickshaw