शाहूवाडी तालुक्‍यात आज शाळा बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

शाहूवाडी - तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीच शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (ता. २०) शाळा बंद ठेवाव्यात, असे अावाहन त्यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यांना केले आहे.  

तालुक्‍यात एकूण १३० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आठ ठिकाणच्या प्राथमिक शाळांत तर एकही शिक्षक नाहीत. स्थानिक पालकांतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत विचारणा होत आहे. अशा ठिकाणी अन्य शाळांतील शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात देऊन शाळा चालू ठेवाव्या लागल्या आहेत. बदल्यांमुळे जिल्ह्याबाहेर मोठ्या संख्येने शिक्षक गेले. 

मात्र त्या प्रमाणात पुन्हा तालुक्‍याला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या अधिक राहिली. रिक्त ठिकाणी शिक्षक तत्काळ मिळावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. मात्र तरीही शिक्षक न मिळाल्याने शाळा बंद आंदोलन घेत असल्याचे निवेदन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी तहसीलदारांना दिले. पंचायत समितीचा शिक्षण विभागही सकाळी सुरू करू देणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

Web Title: School Close Agitation in Shahuwadi Tahsil