शालेय साहित्य  बाजारात ; विद्यार्थी घरात! 

download (4).jpg
download (4).jpg

सोन्याळ (सांगली) ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु करीत आहेत. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नेहमीप्रमाणे शाळा सुरु होतील. या शक्‍यतेने शालेय साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकानी बाजारपेठेत दुकानात साहित्य विक्रीस ठेवले आहे. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरु झाल्याने पालक अद्याप साहित्य खरेदीसाठी येत नसल्याने दुकानदार चिंतित आहेत. 

दरवर्षी जून महिन्यामध्ये शालेय साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळया प्रकारच्या वह्या, कंपास बॉक्‍स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग, आदींनी दुकाने सजली आहेत. महागाई वाढली असली तरी प्रत्येक पालकाच्या बजेटनुसार शालेय साहित्य उपलब्ध असते. बहुतांश कामगार वर्गाचे पगार महिन्याच्या पहिल्या किंवा फार उशीर झाल्यास दुसऱ्या आठवड्यात होतात. मात्र, लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. 

यातच जून महिना हा पालकांसाठी खर्चाचा महिना असतो. यंदा सर्वसामान्य व गोरगरिब पालकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शालेय साहित्य विकत घ्यायला बहुतांश पालकांकडे पैसे नाहीत. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येत नाही. तोपर्यंत शाळा सुरु होणार नसल्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षीसारखी यावर्षी शालेय साहित्य घेण्याची पालकांची तयारी नाही.त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com