सातवीतल्या संकेतचे 'क्रिएटिव्ह व्हीजन'! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 30 मार्च 2018

सोलापूर : माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी यू-ट्यूबचा वापर वाढला आहे. आपल्याला हवं ते यू-ट्यूबच्या माध्यमातून आपण सर्च करून पाहू शकतो आणि आपल्याकडे काही वेगळं असेल तर जगाला दाखवू शकतो. असाच काहीसा प्रयत्न सोलापुरातील सातवीत शिकणारा विद्यार्थी संकेत पोलके करीत आहे. त्याने क्रिएटिव्ह व्हीजन नावाचे यू-ट्यूब चॅनेल काढले असून इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि नवीन टेक्‍नॉलॉजी कशी वापरायची हे तो सांगत आहे. 

संकेत हा सेंट थॉमस इंग्लिश मीडियम शाळेत सातवीमध्ये शिकत आहे. त्याचे वडील मदन पोलके हे जुळे सोलापुरातील गणेश नाईक शाळेत शिक्षक आहेत. तर आई पौर्णिमा पोलके या कर्जाळ येथील शाळेत शिक्षिका आहेत. संकेतला लहानपणापासून काही तरी वेगळं करण्याची आवड आहे. घरातील टाकाऊ वस्तूंपासून अनेक नवीन वस्तू तयार केल्या आहेत. याबाबतची माहिती त्याने यू-ट्यूबच्या माध्यमातून घेतली. यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहता-पाहता त्याने स्वत:चे क्रिएव्हिट व्हीजन-फ्लॅश इनोव्हेशन नावाचे यू-ट्यूब चॅनल काढले आहे. बाजारात नवीन इलेक्‍ट्रॉनिक वस्तू किंवा अन्य टेक्‍नॉलॉजी आली तर ती कशी वापराची, हे तो सांगतोय. मोबाईलवर स्वत:च चित्रीकरण करतो आणि एडिटिंग करून यू-ट्यूबवर पोस्ट करतो. 

टीव्हीवरच्या कार्टून्स पाहत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या संकेतचा आदर्श घ्यायला हवा. गेल्या महिनाभरापासून त्याच्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

आई, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे असा नवीन प्रयोग करून पाहत आहे. 
- संकेत पोलके, विद्यार्थी

Web Title: school student uses youtube channel edits and uploads video about new technologies