कऱ्हाड : विद्यार्थ्यांनी बनविले चक्क दहा रोबोट

Robot
Robot

कऱ्हाड : शाळा म्हटल की, वेगळा प्रयोग अन् त्या प्रयोगाच प्रात्याक्षिक इथपर्यंतच सगळ होत. मात्र येथील टिळक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क दहा रोबोट तयार केले आहेत. केंद्राच्या निती आयोगतर्फे राबवण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब योजनेतंर्गत जिल्ह्यातून टिळक हायस्कूलची निवड झाली आहे. त्याच योजनेतंर्गत शाळेला वीस लाखांचे अऩुदान प्राप्त झाले आहे. त्याच्या पहिल्या पहिल्या टप्प्यातील अनुदानातून रोबोट लॅब उबी करण्यात आली आहे.

त्या योजनतून विद्यार्थ्यांनी रोबोट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून स्वयंचलीत प्रोग्रॅमचे तीन, मॅन्युअली प्रोग्रॅमचे चार, सेन्सॉरचे तीन असे दहा रोबोट तयार केले आहेत. त्या शिवाय सेन्सॉरची अन्य उपकरणे, सोलर पॅनेल व थ्रीडी प्रिंटरही तयार करण्यात आले आहे. टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अविष्कार परिसरातील शाळांना पाहण्यास खुला केला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 

शाळेचे मुख्याध्यापक जी. जी. आहिरे यांच्या नेृत्वाखाली विज्ञान शिक्षक जीवन थोरात, डॉ. सौ. एम. एम. मुल्लापुर यांच्या मार्गदर्शनखाली रोबोटसह लॅब उभी राहिली आहे. ती लॅब उभी करण्यासाठी आठवी व नववीतील बारा विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यात सोहम नलवडे, सुश्रूत सातभाई, हर्षवर्धन आवटे, स्वरूप जगताप, सर्वेश घोलप, धनंजय थोरात, मिलींद जाधव, वेदांत ढापरे, मंदार मोळावडे, प्रथमेश देशमाने, सिद्धेश कुंभार, कल्याण जोशी यांनी सहभाग घेतला. अनुदानातून लॅब आल्यानंतर प्रथम लॅब उभा करण्यात आली. त्यानंतर वरील निवडक शिक्षक व विद्यर्थ्यांचे प्रसिक्षण घेण्यात आले. त्यानंतर रोबोट तयार करण्याची प्रक्रीया सुरू झाली. रोबोटसह त्या लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी थ्रीड प्रिंटींग, आरडीनो व सेन्सरवर आधारीत उपकरणे तयार करण्यात आली.

केंद्राच्या निती आयोगाकडे मध्यंतरी शाळांमध्ये भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव देण्यात आले होते. त्यात जिल्ह्यातील 257 शाळांनी तो प्रस्ताव दिला होता. त्यापैकी केवळ टिळक हायस्कूलची त्यासाठी निवड झाली. जिल्ह्यात एकमेव निवड जालेल्या टिळक हायस्कूलला निती आयोगाचे वीस लाखांचे अनुदान जाहीर झाले. त्याच्या पहिल्या टप्प्याचे बारा लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातून रोबोट तयार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आठवी व नववीतील बारा विद्यार्थ्यांनी ते रोबट तयार करण्याचे कौशल्य प्रप्त केले. त्यांना श्री. थोरात, सौ. मल्लापूर यांचे म्राग्दर्शन लाभले. त्यातून दहा रोबटसह थ्रीडी प्रंटर, उंची मापण्याचे सेन्स यंत्र व अन्य उपकरण तयार केली. रोबोटमध्ये तीन प्रकार तयार केले आहेत. त्यात स्वयंचलीत प्रोग्रॅमचे चार रोबोट तयरा केले आहेत. मॅन्युअलचे तीन व सेन्सरचे तीन रोबोट तयार केले आहेत. त्याचे प्रात्याक्षीक दाखवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कलागुणांना वाव मिळला आहे. विद्यार्थ्यांचे संशोधन बाहेरील शाळांनाही पाहता व अभ्यासता यावे, यासाठी ते रोबोट प्रात्याक्षीक अन्य शाळांसाटी खुले ठेवले आहे. त्या रोबोटच्या क्रायशाळेत अन्य शाळेतील विद्यार्थ्याजावून ते संशोधन पाहून येतात. त्याची प्रात्याक्षीके तेच विद्यार्थी करून दाखवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com