स्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

लवादाचा निर्णय परिवहनच्या बाजूने लागल्यास उपक्रमाचे फार मोठे नुकसान टळणार आहे. परिवहनकडे काम करत असतानाही कंपनीच्या हितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल. 
- तुकाराम मस्के, सभापती महापालिका परिवहन उपक्रम 

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने त्या स्क्रॅप झाल्याचा निष्कर्ष तपासणी पथकाने काढला आहे, अशी माहिती समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, या संदर्भातील निकाल आठ जानेवारी रोजी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मस्के म्हणाले, "निकषानुसार या चेसीचा आकार 12 मीटर असणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्ष मोजणीवेळी हा आकार 11.80 मीटर असल्याचे आढळून आले आहे. 20 सेंटिमीटरने आकार कमी असल्याने या चेसी स्क्रॅप झाल्या आहेत. लवादासमोर हा दावा सुरू आहे, त्या ठिकाणी परिवहन प्रशासनाच्या वतीने हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात येणार आहे. चेसीचा आकार कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने लेलॅण्ड कंपनीकडे झुकलेला निकाल आता परिवहन उपक्रमाकडे झुकला आहे.'' 

गृहविभागाकडे सुमारे दीड कोटी रुपयांचे पोलिस अनुदान थकले आहे. या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेच्या बसमधून पोलिस कार्यालयीन कामासाठी प्रवास करतात याची माहिती पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना पुराव्यासह दिली आहे. त्यामुळे हे अनुदानही लवकरच मिळण्याची शक्‍यता आहे, असेही श्री. मस्के म्हणाले. 

लवादाचा निर्णय परिवहनच्या बाजूने लागल्यास उपक्रमाचे फार मोठे नुकसान टळणार आहे. परिवहनकडे काम करत असतानाही कंपनीच्या हितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल. 
- तुकाराम मस्के, सभापती महापालिका परिवहन उपक्रम 

Web Title: scrap bus issue in Solapur