कृषी योजनेच्या 1275 लाभार्थींची निवड 

Selection of 1275 beneficiaries of agricultural scheme
Selection of 1275 beneficiaries of agricultural scheme

नगर ः कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत या योजनांच्या 1275 लाभार्थींची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली. 


अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत करण्यात आली. यासाठी ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे एकूण 2801 अर्ज आले होते. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे 1127 व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे 148 असे एकूण 1275 लाभार्थी सोडत पद्धतीने निवडण्यात आले. 

या प्रसंगी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, भूजल सर्वेक्षण यंत्रणाचे ए. ए. काटकर, समाजकल्याण निरीक्षक टी. टी. कातकडे, राजूर प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे डी. बी. खेडकर, कार्यकारी अभियंता किशोर गिते, तंत्र अधिकारी ए. ए. सपकाळ 
आदी उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेसाठी 885.72 लाखांचा निधी, तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने (क्षेत्राबाहेरील)साठी 55 लाखांचा निधी मंजूर आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 65 लाखांचा निधी उपलब्ध आहे. या योजनांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरी, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, सूक्ष्म सिंचन, वीजजोडणी, शेततळे अस्तरीकरण, पाईपलाईन, इनवेल बोअर, परसबाग आदींचा लाभ मिळणार आहे. 


या योजनांसाठी कर्जत, राहुरी, राहाता, श्रीरामपूर या तालुक्‍यांतून प्राप्त अर्जांची संख्या त्यांच्या मंजूर आर्थिक लक्षांकाचे अधीन असल्याने सर्व प्राप्त लाभार्थींच्या अर्जाला मान्यता देण्यात आली. उर्वरित तालुक्‍यातील अर्जांची संख्या लक्षांकापेक्षा अधिक असल्याने उपस्थित असलेल्या अर्जदारांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत प्रक्रियेद्वारे लाभार्थी निश्‍चित करण्यात आले.

या प्रक्रियेसाठी जिल्हा कृषी अधिकारी विलास गायकवाड, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, सारंग दुगम, कक्ष अधिकारी पांडुरंग नेटके, कनिष्ठ सहायक मंजूषा देवळालीकर यांनी सहकार्य केले. 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने (क्षेत्रांतर्गत) साठी 88 लाखांचा निधी उपलब्ध आहे. ही योजना फक्त अकोले तालुक्‍यासाठी आहे. त्याची सोडत गुरुवार (ता. 21) रोजी अकोले पंचायत समितीमध्ये होणार आहे. या 
योजनेंतर्गत मंजूर बाबींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अजय फटांगरे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com