उद्योजकतेला बचत गटांचा हातभार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कऱ्हाड - राज्यात अल्पसंख्याक उद्योजक महिलांची प्रगती केवळ आर्थिक व कौशल्य नसल्याने खुंटली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक महिला उद्योजकांची पिछेहाट होत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील महिलांचे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी बचत गटांचा हातभार लागणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना पतपुरवठा केला जाणार आहे. 

अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील महिलांच्या उद्योजक कौशल्याला वाव मिळावा, यासाठी अल्पसंख्याक महिलांचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून अल्पसंख्याक महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठीची पावले उचलली जाणार आहेत. शासनाने त्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी ४० लाखांचा निधी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे.

अल्पसंख्याक बहुल भागात २४०० बचत गट स्थापण्याचेही उद्दिष्ट आहे. या बचत गटांना मॉनेटरिंगसाठी १३ लोकसंचलित साधन केंद्रांची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शासनाने आठ वर्षांच्या कालावधीत तेराही लोकसंचलित साधन केंद्र प्रत्यक्षात सुरू करायची आहेत. त्यासाठी २७ कोटी ५४ लाख ३२ हजार ६०० रुपयांची तरतूद केली आहे. तो निधी टप्प्याटप्प्याने दिला जाईल.

योजनेतील महत्त्वाचे 
 डिसेंबर २०१८ पर्यंत एक कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध 
 लाभार्थी महिलांसाठीचे उपयोगिता प्रमाणपत्र देणे बंधनकारक 
 उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाचा पुढाकार 
 आठ वर्षांत तेरा लोकसंचलित साधन केंद्रे उभारणार 
 २७ कोटी ५४ लाख ३२ हजार ६०० रुपयांची तरतूद

Web Title: self help group support to Entrepreneurship