सर्वाधिक विक्रीत सरकी तेल २० वर्षे पहिल्या क्रमांकावर

तीन महिन्यांपासून दरातील अंतर कमी; किलोमागे १५ रुपयांनी घट
सर्वाधिक विक्रीत सरकी तेल २० वर्षे पहिल्या क्रमांकावर
sakal
Updated on

सांगली: खाद्यतेलात सर्वाधिक खपाचे तेल म्हणून, गेली २० वर्षे सरकी तेल आजही पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे तेल अशी सरकीची सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ओळख आहे. त्याच दरात उपलब्ध असलेल्या सोयाबीन तेलाकडे, मात्र सांगलीकरांनी पाठ फिरवली आहे. सरकी व शेंगतेलात किलोला ३० ते ५० रुपये, तर सरकी व सूर्यफूल दरात २० ते २५ रुपयांचा किलोला फरक होता. गेल्या सहा महिन्यांत हा फरक कमी झाल्यामुळे आता ग्राहक अन्य तेल खरेदीकडे वळला आहे.

सर्वाधिक विक्रीत सरकी तेल २० वर्षे पहिल्या क्रमांकावर
मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" कार्यक्रमाची तालीम

२००१ पर्यंत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांचा फिल्टर शेंगतेलाकडे ओढा कायम होता. त्यानंतर परिस्थितीत मात्र झपाट्याने बदलली. सर्वसामान्य ग्राहक सरकीकडे, श्रीमंत वर्ग सूर्यफुलाकडे; तर आरोग्यांची काळजी करणारे लोक शेंगतेल खरेदी करत होते. ही परिस्थिती जून-जुलै २०२१ पर्यंत कायम होती. गेल्या तीन महिन्यांपासून तेलाच्या दरातील तफावत कमी झाली आहे. यामुळे आता ग्राहक सरकीकडून अन्य तेलांकडे वळतो आहे.

इंधन, गॅस दरवाढीने लोक त्रस्त झालेले असताना गेल्या दोन महिन्यांत खाद्यतेलांच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. प्रतिकिलोला १५ रुपयांनी घट झाली आहे. महागाईचा आगडोंब उडाला असताना गृहिणींसाठी हा दिलासा मानला जातो. सर्वाधिक मागणी असलेल्या सरकी तेलानंतर सूर्यफुलाला मागणी असते. सध्या सरकी, सूर्यफूल आणि शेंगतेलाच्या दरातील केवळ ११ ते १३ रुपयांच्या फरकामुळे शेंगतेलालाही सध्या सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे.

आरोग्यांची काळजी घेणाऱ्या काही मोजक्या लोकांची लाकडी घाण्यावर काढलेल्या शेंगतेलाच्या खरेदीकडे वळताहेत. त्यासाठी त्यांची सध्याच्या दरापेक्षा किलोला १०० रुपये जादा मोजायची तयारी आहे. हा वर्ग वाढत गेला, तर शहरांसह खेड्यातील तेलघाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खेडेगावात तेलघाणे आहेत. मात्र सध्या त्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.

"सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गेली २० वर्षे सरकी तेलाला सर्वसामान्यांची पसंतीत उतरले आहे. दरातील फरक कमी झाल्यानंतरही सर्वाधिक सरकी तेलच खपते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेजी-मंदीवर खाद्यतेलाचे तर अवलंबून असतात. देशात ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते." - राजेंद्र नटवरलाल लड्डा, राजेंद्र ट्रेडिंग कंपनी, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nipani flyover wall collapse after heavy rain
Fertilizer Shortage India
Best places to visit in Shirala during monsoon
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Marathi News Esakal
www.esakal.com