ज्येष्ठ नागरिकांना "राष्ट्रीय संपत्ती" म्हणून घोषित करावे : विजय देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

ज्येष्ठ नागरिकांना "राष्ट्रीय संपत्ती" म्हणून घोषित करावे : विजय देशमुख

उमरगा : भारतातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना "राष्ट्रीय संपत्ती" म्हणून घोषित करण्यात यावे आणि दहा हजार मासिक सन्मानधन मंजूर करावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण भागातील गावागावात आणि शहरी भागातील वार्डावार्डात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचे अध्यक्ष विजय देशमुख दबडगावकर यांनी केले.

या देशव्यापी अभियानांतर्गत येथील इंद्रधनू वृध्द सेवा केंद्र येथे शनिवारी (ता. २०) आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य वेदकुमार वेदालंकार होते. दक्षिण मराठवाडा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. कुलकर्णी, अस्मिता विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. सागर पतंगे, सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. चव्हाण, प्राचार्य शिवानंद दळगडे, कमलाकर भोसले, उमरगा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. माळी गुरूजी, ज्येष्ठ कलोपासक विश्वनाथ महाजन, अस्मिता विश्वस्त मंडळाचे संचालक प्रा. रत्नाकर पतंगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा: ...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचे संस्थापक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांच्या पुढाकाराने विविध मागण्यांच्या प्रस्तावाचे सादरीकरण भारत सरकारकडे २०१८ सालीच करण्यात आले आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्येष्ठांनी सक्रीय होणे गरजेचे आहे. देशातील चाळीस कोटी ज्येष्ठ हे सत्ता आणुही शकतात आणि बदलूही शकतात, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे श्री. देशमुख दबडगावकर यांनी सांगितले. डॉ. बी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. कुलकर्णी, प्राचार्य श्री. वेदालंकार, प्रा. डॉ. रमेश पात्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. अभयकुमार हिरास यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. मारूती खमीतकर यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले. दरम्यान या वेळी इंद्रधनूसाठी रोख स्वरूपात देणगी देणारे मदन गोजे (बेळगाव) यांचा अस्मिता विश्वस्त मंडळाकडून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही ; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

प्रा. ज्ञानेश्वर चित्तमपल्ली, प्रा. डॉ. डी. पी. चव्हाण, प्रा. डॉ. योगिराज विजापूरे, प्रा. डॉ. विलास होगाडे, प्रा. संजय बडोदकर, प्रा. प्रमोद चौधरी, चेतन पतंगे,ज्येष्ठ नागरिक संघ लातूरचे विलास शिंदे, इंद्रधनुतील निवासी आदींची उपस्थिती होती.

इंद्रधनू वृध्द सेवा केंद्राचे निवासी काळजीवाहक किरण बेळमकर यांच्यास कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

loading image
go to top