जेष्ठ पत्रकार संजय आवटे लिखीत "आम्ही भारतीय लोक" या पुस्तकाचे लोकार्पण

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मोहोळ (सोलापूर) - देशासह राज्यात महापुरुषांचे अपहरण केले जात असुन, जाणीवपूर्वक जातीय तणाव वाढविण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ प्रवृती कडुन होत आहे. त्यासाठी जनतेने अधिक जागृत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.  

मोहोळ येथे ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने संजय आवटे लिखित We the Change "आम्ही भारताचे लोक" या  पुस्तकाच्या ४ थ्या आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते  बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक तथा मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी व्यासपिठावर लेखक संजय आवटे, जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, नगराध्यक्ष रमेश बारसकर, जि .प .सदस्य उमेश पाटील,  अॅड गोंविद पाटील, नंदकुमार फाटे, चेबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नाना डोके, गटनेते प्रमोद डोके, भिमयुवा प्रतिष्ठानचे अॅड विनोद कांबळे, रामभाऊ खांडेकर, शशिकांत ठोकळ, आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी १०० पुस्तके रोख विकत घेत ही पुस्तके १०० गावातील प्रत्येक वाचनालयामध्ये वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा म्हणाले आज सत्ताधाऱ्याकडुन विरोधकाजवळ नेताच नाही हे सांगितले जात आहे. पण येणारी देशाची लोकसभेची निवडणुक नेत्यावर नाही तर नितीवर लढली जाणार आहे. त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक देशभक्त, राष्ट्रपुरूष, राजकीय, सामाजिक व्यक्तीचा, विसर पडु देऊ नका. या कार्यक्रमास समाजातील सर्व थरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थीत होते. प्रास्ताविक अनिल कोरे यांनी तर सुत्रसंचालन शिलवंत क्षिरसागर यांनी केले. आभार नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मानले  

Web Title: Senior journalist Sanjay Awate writes about the book "aamhi bharatiya lok"