Buddhist Caves : 'प्राचीन ठेवा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, बौद्ध विहार-गुंफा आणि लेण्यांचा विध्वंस थांबवा'

सांगली जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचे रूपांतर शिवमंदिरात केल्याचे दिसून आले.
Buddhist Vihara Caves
Buddhist Vihara Cavesesakal
Summary

गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे तर ग्रीस, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारतात सम्राट अशोकाचे साम्राज्य होते तिथपर्यंत पसरला होता.

सांगली : कोल्हापूर, सातारा आणि सांगली या दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पर्वतरांगांत साधारण दोन हजार वर्षांपूर्वीचे बौद्ध विहार (Buddhist Vihara), गुंफा व लेणी (Buddhist Caves) आहेत. त्यांच्या संरक्षणाची गरज आहे. याविषयी सामान्य जनता अनभिज्ञ आहे, तर महाराष्ट्र शासन उदासीन. त्यामुळे धर्म, इतिहास व्यापारी मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष उद्ध्वस्त होण्याच्या अवस्थेत आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त करून त्यांनी पुरातत्त्व विभागामार्फत संरक्षणाचे आवाहन केले आहे.

Buddhist Vihara Caves
धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय? चोरीच्या संशयातून पत्नीची भोंदूबुवासमोर विवस्त्र पूजा

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी जवळच्या मल्लिकार्जुन मंदिराजवळच्या शिवमंदिरातील बौद्ध गुंफा व विहार आणि खंडेराजुरीजवळील गिरिलिंग व जुना पन्हाळा येथील गुंफा व लेण्यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. डॉ. देसाई यांच्या मते, गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे तर ग्रीस, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारतात सम्राट अशोकाचे साम्राज्य होते तिथपर्यंत पसरला होता.

Buddhist Vihara Caves
Karnataka Politics : लिंगायत मतदार भाजपकडं वळणार? 'या' बड्या नेत्याच्या सुपुत्राला 'प्रदेशाध्यक्ष' करुन भाजपनं खेळला वेगळाच डाव

महाराष्ट्रात कोल्हापूरला बुद्धांच्या पवित्र अस्थि व रक्षा असणारा स्तूप त्यांनी शोधला. नुकतेच भुदरगड किल्ल्यावरील बौद्ध गुहा त्यांनी उजेडात आणल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने यांची नोंद करावी, अशी विनंती डॉ. देसाई यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचे रूपांतर शिवमंदिरात केल्याचे दिसून आले. यापुढे तरी नैसर्गिक व मानवी कारणाने हा मौल्यवान सांस्कृतिक वारसा उद्‌ध्वस्त होऊ देऊ नये, याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com