ज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 17) रात्री नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता त्यांच्या बेन्नूर नगर, विजापूर रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या मागे दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

प्रा. बेन्नूर हे गेल्या सहा महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना घरी आणले होते. मात्र रात्री नऊ वाजता घरीच त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रा. बेन्नूर यांचे 13 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेक विद्यापीठांना त्यांनी विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले असून, अनेक विद्यापीठांनी त्यांना संशोधन व्यक्ती म्हणून आमंत्रित केले होते. 1970 पासून ते सामाजिक कार्यात सहभागी होते. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

Web Title: Senior Thinkers Fakruddin Bennur Death