ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील रेंदाळ येथील दोघे गंभीर जखमी

सौंदलगा येथे भुयारी मार्गाजवळ जवळील घटना
Accident News
Accident Newssakal

निपाणी : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सौंदलगा येथे भुयारी मार्गाजवळ शुक्रवारी (ता.१५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष सुभाष कुंभार (वय २६) आणि सचिन वसंत शेलार (वय २९, दोघेही रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, रेंदाळमधील दोघेहीगंभीर जखमी दुचाकीवरून निपाणीकडून रेंदाळकडे निघाले होते.

सौंदलगा येथील उड्डाणपुलाच्या खालून ते जात असताना केरळकडून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात कुंभार आणि शेलार दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील अस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही परिस्थिती स्थिर असून ट्रक चालक कुंजपण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात केली जात होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com