सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूका संपन्न

हुकूम मुलाणी
सोमवार, 19 मार्च 2018

सोसायटीतील सभासद कमी केल्यावरून पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवानंद पाटील यांना ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवर वर्चस्व प्रास्थपित करणे शक्य झाले. 

मंगळवेढा - तालुक्यातील तळसंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत आ प्रशांत परिचारक समर्थक शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात जागा जिंकून पंधरा वर्षानंतर वर्चस्व प्रास्थापित केले. आवताडे गटाला सहा जागा मिळाल्या. तेरा पैकी एक बिनरोध झाली. 12 जागांसाठी आज मतदान झाले होते. दोन्ही गटाकडून प्रचार यंत्रणा नेटाने हालवली प्रचारादरम्यान विविध मार्गाने मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

सोसायटीसाठी चुरसीने मतदान झाले. मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली. सहकारी संस्थेच्या निवडणूकीच्या आ परिचारक गटाने तालुक्यात खाते उघडले. सोसायटीतील सभासद कमी केल्यावरून पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवानंद पाटील यांना ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवर वर्चस्व प्रास्थपित करणे शक्य झाले. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र सारवडे (236), सुनिल शेणवे (242), सुखदेव शिंदे (241), चंद्रकांत पाटील (240), अतुल मुंगसे (237), राजेंद्र जामगोंडे (235), सतीश आवताडे (232), शिवाप्पा हुग्गे (231), सुुुभाष खंडागळे (247), आडव्याप्पा दुधाळ (245), ललिता आवताडे (246), मिनाक्षी कानडे (244) हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी डी. केे. मुधाळे काम पाहिले.

Web Title: seva co operation society elections over result