कडेगाव नगरपंचायतीत सात नगरसेवकांचे बंडाचे निशाण

कडेगाव नगरपंचायतीत सात नगरसेवकांचे बंडाचे निशाण

कडेगाव - नगरपंचायतीच्या सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकात उभी फूट पडली असून सात नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मुख्याधिकारी चरण कोल्हे व नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांचा सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेवकांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे. असा आरोप काँग्रेसच्या उपनगराध्यक्षासह सात सत्ताधारी नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव व मुख्याधिकारी चरण कोल्हे यांचा नगरपंचायतीच्या कारभारात कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनाच विचारात घेतले जात नाही, त्यांचा मनमानी कारभार चालला असून नगराध्यक्षा सौ.जाधव व मुख्याधिकारी श्री.कोल्हे हे नगरसेवकांना न विचारात घेता विविध कामे मंजूर करत आहेत. तसेच विकास कामांच्या निधीचे वाटप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात  कॉंग्रेसचे उपनगराध्यक्षासह सात नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या सर्व  साधारण सभेवर बहिष्कार घातला.    
तर 6 ऑक्टोंबर 2018 रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सभेत सर्वानुमते विषय मंजूर झाले असताना प्रोसेडिंग बदलून नवीन विषय बेकायदेशीररित्या घालण्यात आले.तसेच मूळ विषय पत्रिका तेरा मुद्याची असताना बैठक झाल्यानंतर त्यामध्ये खाडाखोड करून नवीन दोन विषयाचा समावेश करण्यात आला. त्याची कल्पना कोणत्याही नगरसेवकाला देण्यात आली नाही.

एकंदरीत नगराध्यक्षा जाधव व मुख्याधिकारी चरण कोल्हे यांचा नगरपंचायतीच्या कारभारात मनमानी कारभार चालला आहे. त्यामुळे आम्ही सात नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला असल्याचे कॉंग्रेसचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील, नगरसेवक प्रशांत उर्फ राजू जाधव, सागर सूर्यवंशी, श्रीरंग माळी, नगरसेविका संगीता राऊत, संगीता जाधव आणि रिजवाना मुल्ला यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम पाटील, सुरेश निर्मळ, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com