आदर्श पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्काराने सात संपादकांचा गौरव 

Seven editors are honored for the Ideal Journalism
Seven editors are honored for the Ideal Journalism

नगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पुणे येथे आयोजित सोहळ्यात "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह देशभरातील प्रसिद्धिमाध्यमांमधील सात संपादकांना आदर्श पत्रकारिता विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकनाथ स्वामी महाराज यांना जीवनगौरव, तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या आठ सामाजिक कार्यकर्त्यांना संघातर्फे गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल व तुळशी वृदांवन, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, दादा महाराज नगरकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, गंगा गोयल फाउंडेशनच्या गीता गोयल, शिकागोचे एकलव्य प्रभू, "इस्कॉन'चे राधेश्‍याम आदी या वेळी उपस्थित होते. 

ऐक्‍यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची

"इस्कॉन'चे जागतिक कीर्तीचे स्वामी लोकनाथ महाराज म्हणाले, ""स्वार्थ हाच मनुष्याचा प्रमुख शत्रू आहे. त्यामुळे समाजसेवेत स्वार्थ नको. निःस्वार्थपणे केलेली सेवाच फक्त भगवंतापर्यंत पोचते. त्यासोबत जगामध्ये ऐक्‍याची, विश्वबंधुत्वाची भावना पसरविणे व जोपासणे फार महत्त्वाचे आहे. त्यात माध्यमांनाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल.'' 

जाणून घ्या- हे थ्रील अनुभवा 

सकारात्मक विचारांची जोपासना व्हायला हवी

सुनील देवधर म्हणाले, ""जनतेची सेवा केली की जनार्दनाची सेवाही आपोआपच घडते. मानवताधर्म ही संतांनी दिलेली शिकवण आहे.'' सकारात्मक विचारांची नेहमी जोपासना व्हायला हवी, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. पुणे संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी स्वागत केले. आदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com