देवदर्शनाहून परतताना अपघातात एकाच कुटुंबातील 7 ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पहाटे थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागील बाजूने मिनी बस आदळून या एकाच कुटुंबातील सातजण ठार झाले.

कवठेमहांकाळ : आगळगाव फाटा येथे आज (शुक्रवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण झालेल्या अपघात एकाच कुटुंबातील सातजणांचा जागीच मृत्यू झाला. मूळचे कोल्हापूरजवळील वळीवडे गांधीनगरचे रहिवाशी असणारे हे कुटूंब पंढरपूरहून देवदर्शन करून घरी परतत असताना 'टेम्पो ट्रॅव्हलर' बसची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

मिरज - पंढरपूर रस्त्यावर आगळगाव फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे पहाटे थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागील बाजूने मिनी बस आदळून या एकाच कुटुंबातील सातजण ठार झाले. सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील आहेत. 

विनायक मार्तंड लोंढे (वय ५०), गौरव राजू नरदे (वय ९), लखन राजू संकाजी (वय ३०), रेणुका नंदकुमार हेगडे (वय ३५), नंदकुमार जयराम हेगडे (वय ४०), आदित्य नंदकुमार हेगडे (वय १३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळीवडे गांधीनगर, कोल्हापूर येथील राहणारे आहेत. 
 

Web Title: seven killed of a family in accident near agalgaon