सातवीची सामान्य मूल्यमापन परीक्षा; येथे पाहा प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

सातवीच्या सामान्य मूल्यमापन परीक्षेला 16 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, प्रश्‍नपत्रिकेत कशाप्रकारचे प्रश्‍न विचारले जातील, याची माहिती जाहीर केली आहे. यानुसार प्रश्‍नपत्रिकेत गद्य, पद्य व पूरक पाठांतरावर आधारीत प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. 

बेळगाव : सातवीच्या सामान्य मूल्यमापन परीक्षेला 16 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, प्रश्‍नपत्रिकेत कशाप्रकारचे प्रश्‍न विचारले जातील, याची माहिती जाहीर केली आहे. यानुसार प्रश्‍नपत्रिकेत गद्य, पद्य व पूरक पाठांतरावर आधारीत प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. 

हे पण वाचा - Video धक्कादायक ; तंबाखू खाऊन शिक्षक देतो विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या; शिक्षकाविरोधात प्राध्यापिकेचे आंदोलन

प्रथम भाषा, व्दितीय भाषा व तृतीय भाषा विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत गद्य व पद्य यावर भर देण्यात येणार आहे. तर गणित, विज्ञान व समाज विज्ञान या विषयांमध्ये अध्याय व विभागानुसार प्रश्‍न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी तसेच त्यांचा बौद्धांक वाढावा यासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य मूल्यमापन परीक्षा घेण्याचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. तसेच परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर परीक्षेचे अधिकृत वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार 16 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण होण्यासह परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, याकरीता शिक्षण खात्याने सुरुवातीच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

हे पण वाचा - त्या पाण्याने घेतला तिचा जीव.... 

सुरुवातीला 4 मार्चपासून परीक्षा घेण्याची तयारी केली होती. 
सातवीची परीक्षा दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमाकडे अधिक लक्ष देण्याची सूचना केली आहे. दरम्यान, प्रश्‍नपत्रिका कशी असेल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. दोन दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करत प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, याची माहिती दिली आहे. सामान्य मूल्यमापन परीक्षेची घोषणा करण्यास विलंब झाल्याने संपूर्ण वर्षातील अभ्यासक्रमावर परीक्षा न घेता दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. 

सामान्य मूल्यमापन परीक्षेसाठी बोर्डाकडून प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सामान्य मूल्यमापन परीक्षेचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी होईल. 
-अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh General Evaluation Exam