
कास (जि.सातारा) ः "कोरोना'च्या भीतीने गावाकडे पळाले आणि "कोरोना'ने वाटेतच गाठले, अशी काहीशी अवस्था निझरे (ता. जावळी) येथील काही चाकरमान्यांची झाली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे सातत्याने सांगितले जात असताना निझरे येथील कोरोना रुग्णाची चुकी
म्हणूया किंवा अजानतेपणी झालेली फसगत म्हणूया; पण त्याचा थेट फटका 72 जणांना बसला. मात्र, योग्यवेळी योग्य माहिती प्रशासनास दिली असती तर या 72 जणांची फरफट नक्की थांबवता आली असती.
निझऱ्यातील तो रुग्ण 21 मार्च रोजी या भागातील टेंपोने गावाकडे आला. या टेंपोतही थोडी थोडकी नाहीत तर 17 लहान-मोठी मुले, महिला व पुरुष होते. ज्या खेतवाडीत सार्वजनिक खोलीवर तो राहत होता, तेथील व टेंपोतील अशा 23 जणांना सोमवारी, घरातील व नातेवाईकांना अशा नऊ जणांना रविवारी, तर प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी डॉक्टर अशा 13 जणांना मिळून पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील 45 जण तर मुलाच्या संपर्कातील 27 असे 72 जण सध्या "सिव्हिल' आणि "क्वारंटाइन'ची हवा खात आहेत.
बर तो गावी आल्यानंतर चार दिवसांत आजारी पडला. प्रथम त्याने कुसुंबीचे प्राथमिक आरोग्य केंद्र 26 मार्च रोजी गाठले. तेथे त्याने आपण आठ मार्च रोजी गावी आल्याचे सांगितले. त्यामुळे कुसुंबीतील डॉक्टरांनीही कोरोना नसणार, या विचाराने नेहमीचे उपचार सुरू ठेवले. त्यानंतर ती व्यक्ती 29 मार्चला मेढा येथील खासगी दवाखान्यात "एक्स रे'साठी गेली. हाच "एक्स रे' घेऊन पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. त्यानंतर सलग तीन दिवस कुसुंबी आरोग्य केंद्रातच रोज आपल्या मुलासोबत येत होती. कुसुंबीतील डॉक्टरांनी सिव्हिल येथे जाण्याचा सल्ला दिला तरी माझ्यावर येथेच उपचार करा, असा आग्रह धरत होती. शेवटी तीन एप्रिलला सर्व परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सिव्हिलला दाखल झाली. 21 मार्च ते तीन एप्रिल या काळात सदर व्यक्ती कुसुंबी परिसरातील काही नातेवाईक, मेढा बाजारपेठ व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होती. याचा फटका त्याच्या मुलालाच पहिल्यांदा बसला आणि मुलगाही पॉझिटिव्ह आला. आता या मुलाच्या संपर्कात क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने आलेले व रूमवर राहिलेले 27 जणही या जाळ्यात अडकले.
"कोरोना'च्या भीतीने गावाकडे पळाले आणि "कोरोना'ने वाटेतच गाठले, अशी त्याची अवस्था झालेली आहे. त्यामध्ये पाच ते सहा लहान मुले आहेत. त्यांच्यावर आज खावलीला क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये तर चार छोट्या मुली आईविना आजोबांबरोबर गावी येत होत्या. आईविना त्यांनी दोन दिवस सिव्हिलमध्ये कसे काढले, याची कल्पनाच करवत नाही. एक लहान मुलगी बेडवरून पडून तिचे डोके फुटले. शेवटी चौथ्या दिवशी आईला खावली येथे आपल्या चिमुकल्यांसाठी धाव घ्यावी लागली. बाकीच्यांच्याही नातेवाईकांची अवस्था वाईट होती. या साखळीत डॉक्टर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी असे महत्त्वाचे घटकही अडकल्याने अगोदरच तुटपुंज्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला. या प्रक्रियेमध्ये मुलगा सोडता अन्य बऱ्यापैकी टेस्ट केलेले रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बराचसा ताण हलका झाला, तर हे क्वारंटाइन लोकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तरीही अजून कुटुंबापासून 14 दिवस बाहेर काढण्याची शिक्षा या सर्वांनाच भोगायची आहे आणि पुन्हा घरी आल्यावर 15 दिवस होम क्वारंटाइनही व्हायचे आहे. त्यामुळे "कोरोना'ला "लाइट'ली घेणारांनी या रुग्णांचा अनुभव समोर ठेवून आता तरी बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हृतिक म्हणाला, कोरोना व्हायरसने माझ्या वडिलांना घाबरलं पाहिजे
रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण
सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी
साहेब शेती शिवाय मजा नाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.