लैंगिक अत्याचारांमुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पंढरीनाथ पाटील
पंढरीनाथ पाटील

कोल्हापूर - प्राध्यापकाने केलेल्या लैंगिक अत्याचारांनी नैराश्‍यग्रस्त झालेल्या महाविद्यालयीन तरुणीने आज विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार आज सकाळी कळंबा तलाव परिसरात घडला. तिची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, करवीर पोलिसांनी या प्रकरणी प्रा. पंढरीनाथ कृष्णात पाटील (वय ३५, रा. कळंबा) याला अटक केली. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - शहरातील एका महाविद्यालयात पाटील प्राध्यापक आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीबरोबर त्याची ओळख झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढून प्रेमसंबंधापर्यंत गेली. त्याचा फायदा घेत पाटीलने तिला साकोली कॉर्नर येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

सोशल मीडियावर अश्‍लील संभाषण करून तसे संदेश पाठवून त्या विद्यार्थिनीला जाळ्यात अडकविले. त्यानंतर तिला आपला विवाह झाला असून, दोन अपत्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर तो तिच्याशी भांडण करू लागला. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी नैराश्‍येत जगत होती. आज सकाळी ती पाटील राहत असलेल्या घराजवळील कळंबा तलावाजवळ गेली. तिने आपल्या नातेवाईकांना आतापर्यंत घडलेला प्रकार सांगून आपण आपले जीवन संपवत असल्याचे मोबाईलवरून सांगितले. हे ऐकून तिचे नातेवाईक घाबरले. त्यांनी तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. 

दरम्यान, परिसरातील नागरिकांना कळंबा तलाव उद्यान परिसरात एक महाविद्यालयीन तरुणी बेशुद्धावस्थेत दिसून आली. तिच्याजवळ एक सॅक आणि किटकनाशकाची बाटली होती. नागरिकांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. तिला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिच्या नातेवाईकांनाही याबाबतची माहिती दिली. ते तातडीने ‘सीपीआर’मध्ये आले. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी प्रा. पंढरीनाथ पाटीलवर कलम ३७६, ३०६ आणि ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला. करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी पोलिस ठाण्याला भेट घेऊन तपासाबाबतच्या सूचना केल्या.

सहा पानांची चिठ्ठी सापडली
पीडित विद्यार्थिनीची सॅक परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांना त्यात त्या विद्यार्थिनीने लिहिलेली सहा पानांची चिठ्ठी मिळून आली. त्यात तिने घडल्या प्रकारासंबंधीची संपूर्ण माहिती स्वहस्ताक्षरात लिहिली आहे. त्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com