शाहू विचार व्हाया व्हॉटस्‌ ॲप, फेसबुक पेज!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराजांचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज, असा जगभर राजर्षींचा गौरव होतो. नव्या पिढीपर्यंत हा शाहू विचार पोचवण्यासाठी येथील शाहू यूथ फाउंडेशनने व्हॉटस्‌ ॲप ग्रुप आणि फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

कोल्हापूर - गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराजांचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज, असा जगभर राजर्षींचा गौरव होतो. नव्या पिढीपर्यंत हा शाहू विचार पोचवण्यासाठी येथील शाहू यूथ फाउंडेशनने व्हॉटस्‌ ॲप ग्रुप आणि फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली वसतिगृहे असोत किंवा शिक्षणाचा कायदा, सामाजिक समतेसाठी घेतलेले निर्णय, राधानगरी धरण असो अशा सर्व विषयांवरील माहिती आणि दुर्मिळ छायाचित्रे फाउंडेशनचे कार्यकर्ते अधिकाधिक तरुणाईपर्यंत पोचवते.

‘कोल्हापूर रिपब्लिक’ नावाच्या यू ट्यूब चॅनेलवरूनही ‘गाणी शाहूराजाची’ जगभरातील शाहूप्रेमींपर्यंत पोचवली जातात. त्याबरोबरच शाहूंचा विचार जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीविषयीही माहिती शेअर केली जाते. नवरात्रोत्सवात नवदुर्गा असो किंवा शिवजयंतीच्या निमित्ताने शिव-शाहू विचारांवर पोस्ट शेअर केल्या जातात. गड-किल्ले संवर्धनासह कोणती पुस्तके वाचावीत, याची माहिती दिली. ‘यंगस्टर्स’ नावाचं पहिलं ई-मासिकही सुरू झाले.

‘यू ट्यूब’ चॅनेलवरून राजर्षी शाहू महाराज आणि कोल्हापूर विषयीची अभ्यासपूर्ण माहिती आम्ही देत असतो. ज्येष्ठ महिलांनी गायिलेली ‘गाणी शाहूराजाची’ या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला.
- सुशांत हराळे

Web Title: shahu maharaj thinking whatsapp facebook page