Shaktipeeth highway farmers protest in Khanapur taluka
esakal
आळसंद : भाळवणी (ता. खानापूर) येथील मुल्लानगरमध्ये काल सकाळी शक्तिपीठ महामार्ग जमीन मोजणीसाठी प्रशासन अधिकारी व पोलिस फौजफाटा तयारीने गेला. मात्र, शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जमीन मोजणी बंद पाडली. ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’, ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे प्रशासनाला नमतं घ्यावं (Bhalvani farmers oppose Shaktipeeth highway Project) लागलं.