शंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नातेपुते - विक्रीकर विभागाकडून कारखान्याला येणे असलेली एक कोटी 60 लाखाची रक्कम निवडणूक खर्चासाठी तरतूद करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यामुळे सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कारखान्याचा गळित हंगाम मागील तीन वर्षांपासून बंद आहे. ऊस उत्पादकांचे 30 कोटी व कामगारांचे 24 महिन्यांचे वेतन देणे आहे. तसेच बॅंकांचे व व्यापाऱ्यांचे 125 कोटी अशी एकूण 225 कोटींची देणी आहेत.

सध्या कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती आहे. कारखान्याकडून उसाचे बिल मिळावे यासाठी काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत. विक्रीकर विभागाकडून येणे असलेल्या रकमेपैकी 39 लाख रुपये मंजूर असून, उर्वरित रक्कम लवकरच येणे अपेक्षित आहे. ही सर्व रक्कम साखर आयुक्तांकडे निवडणूक खर्चासाठी तरतूद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Web Title: shankar sugar factory election