Sangli Politics : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का! आमदार पूत्र करणार भाजपमध्ये प्रवेश

Sangli BJP : पदवीधर मतदारसंघातून शरद लाड इच्छुक आहेत. त्यांनी मतदार नोंदणीही सुरू केली आहे. भाजपकडून पदवीधर मतदारसंघासाठी त्यांना संधी मिळणार का, याचीही चर्चा आहे.
Sangli Politics

Sangli Politics

esakal

Updated on
Summary

शरद लाड भाजपमध्ये दाखल होणार:

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड मंगळवारी (ता. ७) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेश सोहळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता होणार आहे.

चर्चा पूर्णविरामाला — पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पूर्वीच ठरले होते:

काही दिवसांपूर्वी कुंडल येथे झालेल्या चर्चेदरम्यानच पक्षप्रवेश निश्चित झाला होता. आता त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत.

राजकीय समीकरणात बदलाची चिन्हे:

शरद लाड हे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असून भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे.

Sangli Sharad Pawar Group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड मंगळवारी (ता. ७) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता प्रवेश सोहळा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कुंडल येथे जाऊन शरद लाड यांच्याशी चर्चा केली होती, त्या वेळेसच पक्षप्रवेश निश्चित झाला होता. मात्र तो कधी होणार, याची चर्चा सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com