चंद्रकांत पाटलांनी एक निवडणूक जनतेतून लढावी, मग...- शरद पवार

kolhapur
kolhapur

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या या आंदोलनाला भेट दिली. ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेले आंदोलन बसून शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलंब न करता हे आरक्षण जाहिर करावे अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सरकारने आरक्षण दिलं होतं मात्र ते न्यायालयीन प्रक्रिया पर्याय आहे. संसदेत या प्रश्नावर ठराव घेता येईल, कायदा बदलता येईल त्यासाठी सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी मी घेतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार पहिल्यांदाच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला होता. यावेळी शरद पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाही चिमटे काढले.

अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी जपून बोलावे. मी 14 निवडणूक लढल्या आहेत. यातील 7 निवडणुका थेट जनतेतून लढल्या आहेत. मंत्री पाटील यांनी अजून एकही निवडणूक जनतेतून लढलेली नाही. त्यांनी अगोदर 1 निवडणूक जनतेतून लढावी आणि मग माझ्यावर बोलावे, असा टोला खा. शरद पवार यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लावला. 

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा. पवार म्हणाले, काहीही वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत. हीच बाब मुखमंत्र्यांना लागू आहे. एक गोष्ट बरी आहे, येणाऱ्या काळात निवडणूक असून त्याचा आम्हाला फायदा होईल, असा टोलाही त्यांनी लावला. 

राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू आहे. या उद्रेकाच्या आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com