
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापनदिन आहे, मात्र यावर्धापनदिनीच भाजपकडून शरद पवारांना धक्का देण्यात आला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर हे आज (10 जून) सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.