मंगळवेढयातील कायम दुष्काळी गावांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार : शरद पवार 

महेश पाटील
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

सलगर बुद्रुक (सोलापुर) - मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कायम दुष्काळी असणाऱ्या ४५ गावांना कोरडवाहू गावे म्हणून जाहिर करावे. आणि त्या गावांना जास्तीत जास्त दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या शिफारस करणार. तसेच केंद्रात शासन दरबारी पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याचे माजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

दुष्काळी गावातील शिष्ठमंडळ आज पवार यांच्या भेटीला मुंबई येथे गेले होते. यावेळी आमदार भारत भालके, दुष्काळी ४५ गावांच्या संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवले, तानाजी जाधव, महेश पाटील, तानाजी चौगुले, आन्ना वाले, पिंटू शेळके, आदी मान्यवरांचा या शिष्ठ मंडळात समावेश होता. 

दरम्यान आमदार भारत भालके, शिस्टमंडळाचे प्रमूख अंकुश पडवले यांनी दुष्काळी ४५ गावातील दुष्काळी परिस्थिची व्यथा पवारांकडे मांडली. त्यांनंतर शरद पवार यांनी शिष्ठ मंडळात गेलेल्या सर्व शेतकऱ्यांशी दुष्काळी परिस्थिती बाबत आपुलकिने विचारणा केली. येत्या दोन तीन दिवसात तुमच्या सर्व दुष्काळी गावातील शासकीय आकडेवारी माझ्याकडे सादर करा, ही आकडेवारी घेवून मी केंद्रात दुष्काळासाठी नेमलेल्या समितीसमोर सारद करणार आहे. त्यातून तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी शिष्ठ मंडळातील शेतकऱ्यांना दिले.

Web Title: Sharad Pawar will try to help the drought-hit villages in Mangladesad