मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी तरूणी भेटली पवारांना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

शाई फेकल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु पोलिसांनी अद्याप नोटीस दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोले येथे होणाऱ्या सभेस मी उपस्थित राहणार आहे, तेथे मात्र पोलिसांकडून मला अटकाव होण्याची शक्यता आहे, अशी कैफियत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या शर्मिला येवले हिने राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली.

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकलेल्या शर्मिला येवले या तरुणीने आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

शाई फेकल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु पोलिसांनी अद्याप नोटीस दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोले येथे होणाऱ्या सभेस मी उपस्थित राहणार आहे, तेथे मात्र पोलिसांकडून मला अटकाव होण्याची शक्यता आहे, अशी कैफियत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या शर्मिला येवले हिने राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली.

येवले ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून, अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकल्यानंतर ती चर्चेत आली. अकोले येथील प्रश्न मांडून तिने भाजपमध्ये नुकतेच गेलेले आमदार वैभव पिचड यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही तिला अद्याप कोणतीही नोटीस दिलेली नाही. याबाबत तिने सद्यस्थिती पवार यांना सांगितली. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शर्मिला येवले सहभाग घेता येईल का तिला अटकाव केला जाईल, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

शरद पवार हे आज नगरमध्ये आले होते. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून त्याच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharmila Yevle meets NCP chief Sharad Pawar in Nagar