संरक्षण सज्जतेचे आधुनिकीकरण व्हावे : शशिकांत पित्रे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोल्हापूर - ‘‘ जोपर्यंत भारताच्या संरक्षण सज्जतेच्या भारतीयकरणाबरोबरच आधुनिकीकरण करावे लागेल, तेव्हाच भारत पूर्ण संरक्षण सज्ज होईल. त्यासाठी संरक्षण धोरण अधिक बळकट करावे लागेल,’’ असे मत निवृत्त मेजर  जनरल शशिकांत पित्रे यांनी येथे केले. 

कोल्हापूर - ‘‘ जोपर्यंत भारताच्या संरक्षण सज्जतेच्या भारतीयकरणाबरोबरच आधुनिकीकरण करावे लागेल, तेव्हाच भारत पूर्ण संरक्षण सज्ज होईल. त्यासाठी संरक्षण धोरण अधिक बळकट करावे लागेल,’’ असे मत निवृत्त मेजर  जनरल शशिकांत पित्रे यांनी येथे केले. 

येथील महापालिका तर्फे होणाऱ्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेस आज सुरवात झाली. महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. 

श्री पित्रे म्हणाले की, ‘‘भारताला हिंदी महासागराची नैसर्गिक साथ आहे. तर १५ हजार किमीच्या लांब सीमा आहेत. गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचा प्रभाव वाढला तशी राष्ट्रहितांच्या संरक्षणाची जबाबदारी वाढली आहे. अर्थिक, सामाजिक, शेती, राष्ट्राहितांच्या सुरक्षे बरोबरच एकूण भारताचे सार्वभौमत्वाचे संरक्षण करावे लागते. त्यासाठी सरंक्षण सज्जतेचे महत्व वाढते आहे. केवळ शस्त्र व सैन्य संख्येवर संरक्षण सज्जता अवलबूंन नसते. तर नेतृत्वाची गुणवत्ता, राष्ट्रीय नेत्यांचे व जनतेचे मनोबल अशी सगळ्यातून संरक्षण सज्जता बळकट होत असते.’’

ते म्हणाले की, ‘‘ भारतीय संरक्षण सज्जतेला चीन व पाकीस्तान दोन मोठी आव्हान आहेत. चीन सोबत सीमावाद आहे. तिबेटच्या पठारावर महत्वाच्या नद्या उगम पावतात म्हणून भविष्यात पाण्यावरून युध्द होवू शकते. तेथील प्रांत मिळविण्यासाठी चीनचा आटापाटा सुरू आहे.’’ 

भारताकडे पायदळ, वायूदल, नौदलाकडे आधुनिक शस्त्रे आहेत. मात्र त्यातील ७० टक्के  साधन सामुग्री आपल्याला आयात करावी लागते यावर आत्मचिंतन करावे लागेल, युध्दाला लागणारी साधण सामुग्री भारतीय बनावटीची असावी. त्यासाठी आपल्या धोरणातही बदल करावे लागतील यात चिनशी बचावात्मक पवित्रा घेऊन डावपेच आखावे लागतील तर पाकीस्तान सोबत आक्रमकतेने डाव टाकावे लागतील त्यासाठी पुरक संरक्षण यंत्रणा आपल्याकडे आहे.’’ 

Web Title: Shashikant Pitre Comment