Shirala Crime : गणपती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून कोयता, रॉडने हाणामारी

कोयता, काठी व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला.
Beating
Beatingesakal

शिराळा - रेड (ता. शिराळा) येथे गणपती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत रोहन अशोक पाटील व अनिरुद्ध अशोक पाटील या दोघांना कोयता, काठी व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रोहन अशोक पाटील (वय-२७) याने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी २७ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता रेड येथे सह्याद्री गणेश मंडळची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यावेळी इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे मिरवणुकीत नाचायचे आहे असा म्हणाला असता त्यास अनिरुद्ध पाटीलने विरोध केला. त्यावेळी मिरवणूक पुढे न्यायची नाही मी नाचणारच असे म्हणून पंढरीनाथने वाद घातला.

अनिरुद्धला कोयत्याने मारहाण केली. तुषार संजय सातपुते याने रोहन पाटीलला रॉडने ढकलले. राहुल भगवान सातपुते याने काठीने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवलदार भाऊसाहेब कुंभार करत आहेत.

शिराळा - रेड (ता. शिराळा) येथे इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे (वय-२७) यास जातीवाचक शिवीगाळ करून दगड व लाथाबूक्यानी मारहाण केल्याप्रकरणी अशोक ब्रम्हदेव पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील व रोहन अशोक पाटील (रा. रेड) यांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना बुधवर (ता. २७) सप्टेंबर रोजी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास पाटील गल्ली येथील अंगणवाडी जवळ घडली. याबाबत तुषार संजय सातपुते (वय-३२) याने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक ब्रम्हदेव पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील व रोहन अशोक पाटील यांनी हरिजन समाज्यातील लोकांच्यावर असणाऱ्या रागातून तुषार सातपुते याच्या चुलत आत्याचा मुलगा इंद्रजीत कांबळे यास दगड व लाभाबुक्यानी मारहान करून जखमी केले.

त्यावेळी इंद्रजीत कांबळे यास उपचारासाठी समाजातील लोक घेवून जात असताना अशोक पाटील यांनी तुम्हाला लय मस्ती आली आहे तुम्हाला सोडणार नाही अशी दमदाटी केली. अनिरुद्ध व रोहन पाटील यांनी घरातून बाहेर ओढून मारण्याची दमदाटी केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com