शिराळा नगरपंचायतीसाठी होणार तिरंगी लढत

शिवाजीराव चौगुले
शनिवार, 13 मे 2017

सम्राट महाडिक यांची एंट्री - दोन भाऊ पुन्हा वेगळे
शिराळा - शिराळा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ऐनवेळी बेक्र लागल्याने भाजपमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट तिरंगी लढत होणार असल्याने हे असे घडलेच कसे, याची चर्चा सुरू झाली आहे. ऐनवेळी वाळव्यातून पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाचा महाडिक युवा शक्‍तीच्या माध्यमातून सम्राट महाडिक यांनी एंट्री मारून सर्वांना अश्‍चर्यचकित केले आहे.  

शिराळ्याचे राजकारण हे नेहमीच वेगळ्या वळणावर असते. येथे कोणत्या क्षणी काय घडेल याची कोणच खात्री देऊ शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन भाऊंनी या पुढील सर्व निवडणुका आम्ही आघाडीच्या माध्यमातून लढू, असे जाहीर केले होते. त्यानुसार बाजार समिती व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक एकत्रित लढून शिवाजीराव नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवले. या वेळी नगरपंचायत निवडणुकीत ही आघाडीचा फॉर्म्युला चालेल असे सर्वांना वाटत होते, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्यात एकमत न झाल्याने आघाडीला ब्रेक मिळला आहे.

शिवाजीराव नाईक यांनी महाडिक युवा शक्‍तीच्या केदार नलवडे, सम्राट महाडिक यांच्याशी संधान बांधून त्यांना प्रभाग १४ मधून राम जाधव यांच्या माध्यमातून एक उमेदवारी पुरस्कृत केली आहे. त्यामुळे महाडिक युवा शक्‍तीला पहिल्यांदाच निवडणुकीची संधी मिळाली आहे.

चुलते-पुतणे, जावा-जावा व सासू-सुनेत लढत
प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीकडून विश्‍वप्रतापसिंह नाईक व भाजपकडून अभिजित विजयसिंह नाईक या चुलते-पुतण्यांच्यात लढाई आहे.  दोघेही नाईक घराण्यातील आहेत. प्रभाग आठमध्ये काँग्रेसच्या अर्चना कदम व भाजपच्या नंदाताई कदम या सख्ख्या जाऊबाईंत लढत आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपच्या कुसुम निकम, काँग्रेसच्या मनस्वी निकम, राष्ट्रवादीच्या सुनीता निकम या चुलत सासू-सुनांच्यात तिरंगी लढत होत आहे. कदम, नाईक, निकम घराण्याच्या लढतीकडे शिराळकरांची नजर आहे.

राष्ट्रवादी, भाजपमधून बंडखोरी
प्रभाग ७ मधून भाजपच्या मीनाक्षी यादव, प्रभाग दहामधून दीपक गायकवाड व प्रभाग १६ मधून दिलीप घाटगे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बंडखोरी केल्याने तिथे चौरंगी लढत होणार आहे.

Web Title: shirala nagarpanchyat election