
Sangli Crime
esakal
शिराळा: मोटारसायकलचा रेस केल्याच्या कारणावरून रणजित रवींद्र यादव यास लोखंडी रॉड, प्लास्टिक खुर्चीने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शिराळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. रणजित रवींद्र यादव (वय २९, कासारगल्ली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.