Sugarcane Field Leopard
esakal
शिराळा (सांगली) : कापरी (ता. शिराळा) येथील उसाच्या फडात मुक्काम केलेला बिबट्या दोन बछड्यांसह कापरीचा शिवार सोडण्यास तयार नाही. त्यामुळे ‘त्या’ माय-लेकरांची ताटातूट होण्याची व पुनर्भेटीची हॅट्ट्रिक झाली आहे. बिबट्या आपल्या बछड्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षितता म्हणून कापरी येथील १५ दिवसांसाठी ऊसतोड थांबवण्यात आली आहे.