esakal | शिरगुप्पी शुगर वर्क्सकडून 2760 रुपये दर ; 15 दिवसांनी मिळणार बिल| Paschim Maharashtra
sakal

बोलून बातमी शोधा

kalapnna

शिरगुप्पी शुगर वर्क्सकडून 2760 रुपये दर ; 15 दिवसांनी मिळणार बिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागवाड : कागवाड येथील शिरगुप्पी शुगर वर्क्सकडून यंदाच्या 2021-22 गाळप हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन 2760 रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेण्णावर यांनी केली. कारखान्याच्या मुख्य कार्यालयात रविवारी (ता. १०)आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कल्लाप्पाण्णा मगेण्णावर पुढे म्हणाले, 'गेली 2 वर्षे महापूर, अतिवृष्टी, कोरोना महामारीच्या महासंकटात शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून यंदाच्या उसाला प्रतिटन 2760 रुपये दर जाहीर करण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापन, संचालक मंडळाने घेतला आहे.

कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर प्रति 15 दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर उसाचे बिल जमा करण्यात येणार आहे. यंदा 8 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याच्या शेती विभागाने ठेवले आहे. शेतकरीवर्गांने अधिकाधिक ऊस पुरवठा करून हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे.'

यावेळी कारखान्याचे व्ही . पी . मुख्य अधिकारी अरुण फरांडे, मुख्य शेती अधिकारी महावीर बिरनाळे, कौस्तुभ मगेण्णावर, अजित कोत्तलगे, प्रवीण चौगुले, वीरेंद्र जाडर व अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top