Shiv Sena agitates against tahsils on drought
Shiv Sena agitates against tahsils on drought

शिवसेनेचे दुष्काळाबाबत तहसीलसमोर आंदोलन 

नगर तालुका : खरीप हंगामाच्या अखेरीस व रब्बी हंगामाच्या प्रारंभी झालेल्या संततधार पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कांदा यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरिपाचे पीक त्याच्या हाती लागले नाही. तांत्रिक कारणामुळे काही जणांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. 

शासनाने नगर तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, अशी मागणी सोमवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. 
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, अनिल कराळे, पंचायत समिती सभापती रामदास भोर, उपसभापती प्रवीण कोकाटे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत सहभागी झाले होते. 
तहसीलदार उमेश पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. नगर तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेताचे सात-बाराचे उतारे घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. 
 

शेतकरी मदतीपासून वंचित

प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या फळबागांचे पंचनामे झाले नाहीत. नगर तालुक्‍यातील साडेतीन हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित आहे. हे सर्व शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले. नोव्हेंबरमध्ये शासनाने पिके व फळबागांसाठी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. पंचनाम्याअभावी ही मदतही त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com