संसार उध्वस्त करणारांना फासावर लटकवा; उद्धव ठाकरे यांना निवदेन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नगर : केडगावमधील या गुंडांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत. त्यांना थेट फासावर लटविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी मयत शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या परिवाराने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

त्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून खटल्यात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचीच नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार चंद्रकांत खैरे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ""शिवसेना कोतकर व ठुबे परिवाराच्या पाठिशी उभी राहिल. दोन्ही परिवारास भविष्यात अडचणी भासू देणार नाही. तसेच त्यांना काही अडचण वाटल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा.''

ठाकरे यांनी दोन्ही परिवारास मदत म्हणून काही रोख रक्कम, धनादेश दिले. तसेच आरोपीनं फाशीच्या शिक्षेचीच मागणी केली जाईल आणि खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची मागणी केली जाईल, अशी ग्वाही दिली. वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता यांनी ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. या गुडांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले. आता भविष्यात आणखी कोणाचे संसार उध्वस्त होणार नाहीत, याची काळजी घ्या, अशी विनवणी केली.

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackray meets families of slain workers in Nagar