हातकणंगलेत शिवसेनेचे वर्चस्व; पण नगराध्यक्ष काँग्रेसचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

हातकणंगले येथील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरुवात झाली. याठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

हातकणंगले ( कोल्हापूर) - अत्यंत चुरशीने झालेल्या येथील पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अरुण जानवेकर विजयी झाले. 17 पैकी 7 जागा शिवसेनेने तर भाजपने 5 जागा मिळवल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली .अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या.

हातकणंगले येथील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरुवात झाली. याठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने 7 जागा मिळून अव्वल स्थान पटकावले, मात्र भाजपला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली याठिकाणी काँग्रेसचे श्री जानवेकर हे चारशेहून अधिक मतांनी निवडून आले. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गावात प्रचंड जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी गुलालाची उधळण यामुळे गावात जल्लोषाचे वातावरण होते.

विजयी झालेले प्रभाग निहाय उमेदवार -

प्रभाग 1 रोहिणी गुरुदास खोत (अपक्ष )
प्रभाग 2 राजू जयसिंगराव इंगवले (भाजप)
प्रभाग 3 पूजा स्वामी (शिवसेना)
प्रभाग 4 केतन कांबळे ( शिवसेना )
प्रभाग 5 रणजीत धनगर( शिवसेना)
प्रभाग 6 मयूर कोळी (भाजप)
प्रभाग 7 रमजान मुजावर (भाजप)
प्रभाग 8 अरुंधती सूर्यवंशी( भाजप)
प्रभाग 9 छाया पाटील (अपक्ष )
प्रभाग 10 फरीदा मुजावर (काँग्रेस)
प्रभाग 11 दीनानाथ मोरे (भाजप)
प्रभाग 12 प्राजक्ता उपाध्ये( शिवसेना)
प्रभाग 13 अभी लुगडे (अपक्ष)
प्रभाग 14 अलका कांबळे (शिवसेना )
प्रभाग 15 कविता हातकणंगलेकर (शिवसेना)

प्रभाग 16 सोनाबाई इरकर (शिवसेना )
प्रभाग 17 विजय खोत (राष्ट्रवादी काँग्रेस)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv sena Majority In Hatkangale Nagarpanchayat Kolhapur Marathi News