Vidhan Sabha 2019 : धो धो पाऊस पडत होता अन् धैर्यशील गर्जत होता...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भाषण सुरू होऊन काही वेळ झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. एकीकडे मानेंचे भाषण सुरू होते. दुसरीकडे धो धो पाऊस कोसळत होता. मात्र, आपल्या नेत्यावरील प्रेमामुळे सभेला आलेला एकही श्रोता जागचा हलला नाही.

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात राजकीय पक्षांच्या प्रचार सभा होत असताना दिसत आहे. मात्र, इस्लामपूरमधील एका ठिकाणी झालेली प्रचार सभेने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. धो धो पाऊस कोसळत असताना आपल्या नेत्याचे भाषण ऐकायला आलेला एकानेही जागा सोडली नाही. 

हातकणंगलेचे शिवसेनेचे नेते आणि खासदार धैर्यशील माने हे काल इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आले होते. महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत खासदार माने बोलत होते. भाषण सुरू होऊन काही वेळ झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. एकीकडे मानेंचे भाषण सुरू होते. दुसरीकडे धो धो पाऊस कोसळत होता. मात्र, आपल्या नेत्यावरील प्रेमामुळे सभेला आलेला एकही श्रोता जागचा हलला नाही.

हुतात्मा चौकातून पावसाचे पाणी वाहत होते, तरीदेखील लोकांनी जागा सोडली नाही. एकाने उठून खासदार मानेंच्या डोक्यावर छत्री धरली. मात्र, मानेंनी ती छत्री मिटून खाली ठेवली आणि आपले भाषण पुढे सुरू ठेवले. 

यावेळी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार भगवानराव साळुंखे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. सुषमा नायकवडी, वैभव शिंदे, विक्रम पाटील, भीमराव माने, सागर खोत, अमोल पडळकर, वीरभद्र कुदळे, महादेव नलवडे, बाबासाहेब सूर्यवंशी, वाळव्याच्या सरपंच डॉ. शुभांगी माळी आणि शिवसेना-भाजप जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : अभी तो मै जवान हूँ, इनको घर बिठाऊँगा : शरद पवार

- Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटलांसारखा उमेदवार लाभणे कोथरुडकरांचे भाग्य'

- Vidhan Sabha 2019 : करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP Dhairyasheel Mane spoke in the rain