पाण्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

गडहिंग्लज : पूर्व भागातील गावांना हिरण्यकेशी नदीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेने आज रास्ता रोको केले. गडहिंग्लज-संकेश्‍वर मार्गावरील हिटणी नाक्‍यावर हे आंदोलन झाले. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

खणदाळ, नांगनूर, हिटणी, मुत्नाळ, बसर्गे आदी गावांजवळील नदीपात्रात पाणी नाही. त्यामुळे या गावांतील पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. शिवसेनेने आज याच प्रश्‍नावर आंदोलन केले. हिटणी नाक्‍यावर रास्ता रोको केल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाणी आमच्या हक्काचे..., पूर्व भागातील लोकांना पाणी मिळालेच पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाप्रमुख विजय देवणे, चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने यांची भाषणे झाली. 

कार्यकारी अभियंत्यांच्या नावे असलेले निवेदन उपअभियंता नंदकुमार मोरे यांनी स्वीकारले. चित्रीचे लाभक्षेत्र निलजीपर्यंत असूनही शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. पिके उन्हाने वाळत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुका उपप्रमुख वसंत नाईक, संजय पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अवधूत पाटील, जोतिबा मगदूम, रावसाहेब मुरगी, अमर महाडिक, बसवराज स्वामी, मलाप्पा चौगुले, मुरलीधर पाटील, संभाजी येऊडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena protest for water supply in Gadhinglaj kolhapur