कोल्हापूर थेट पाणी योजनेचे काम शिवसेनेने पाडले बंद

बी. डी. चेचर
बुधवार, 10 मे 2017

या योजनेच्या कामामध्ये बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाची चौकशी केली असता या छोट्याशा कामाला अडीच कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी काळामावाडी ते कोल्हापूर या दरम्यानच्या पाईपलाईनचे काम बंद पाडले. 

या योजनेच्या कामामध्ये बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाची चौकशी केली असता या छोट्याशा कामाला अडीच कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यावरून त्यांनी या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार करून जनतेची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप 

कोल्हापूर शहराच्या भविष्यातील वाढीचा विचार करून बनविण्यात आलेल्या या पाणी योजनेचा अंदाजित खर्च सुमारे ४५० कोटी रुपये एवढा आहे. या थेट पाणी योजनेअंतर्गत सुरू असलेले हे पाईपलाईनचे काम शिवसेनेने आज (बुधवार) रोखले. पाणी योजनेच्या कामावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. 

 

Web Title: shiv sena stalled kolhapur water scheme

व्हिडीओ गॅलरी