शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची मोठी कामगिरी! महाराष्ट्राचे डेलिगेट म्हणून IIT तिरुपती येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमात सहभाग

Phase-6 Yuva Sangam : आंध्र प्रदेशाचे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांनी IIT तिरुपती येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत युवा डेलिगेट्सशी संवाद साधला.
Ek Bharat Shreshtha Bharat Program News

Ek Bharat Shreshtha Bharat Program News

esakal

Updated on

आंध्र प्रदेशाच्या वेगवान प्रगतीचा साक्षात अनुभव घेताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत IIT तिरुपती येथील युवा डेलिगेट्स, संशोधक आणि प्राध्यापकांची एक अनोखी मिटींग झाली. विजयवाडा येथील लोक भवनात आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांनी उपस्थित तरुणांना राज्याच्या भविष्यातील संभावनांबद्दल मार्गदर्शन केले. समुद्री उत्पादनांच्या निर्यातीत देशाचा ४० टक्के वाटा असलेल्या आंध्र प्रदेशाने ‘Speed of Doing Business’ मध्येही वेगवान प्रगती साधली असून २०२६ पर्यंत देशातील एकूण गुंतवणुकीच्या २५ टक्क्यांहून अधिक प्रस्ताव या राज्याकडे आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com