शिवप्रतिष्ठानवतीने आयोजित दुर्गामाता दौड सांगलीत उत्साहात 

शिवप्रतिष्ठानवतीने आयोजित दुर्गामाता दौड सांगलीत उत्साहात 

सांगली - शिवप्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडीस आज उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या सुमारास महापौर संगीता खोत यांच्या हस्ते दौडीस सुरवात झाली. हजारो कार्यकर्ते दौडीत सहभागी झाले होते. "जय भवानी-जय शिवाजी' असा जयघोष करत निघालेल्या दौडीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. 

राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या जन्मावेळी मोघलांच्या अत्याचारातून सुटका होण्यासाठी नवरात्रीमध्ये देवीला साकडे घातले होते. त्याची आठवण म्हणून शिवप्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गामाता दौडीचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. दौडीचे यंदाचे 34 वे वर्ष आहे. सांगलीतील मुख्य दौडीबरोबर विविध जिल्ह्यांत आणि ग्रामीण भागातही दौड पोहोचली आहे. 

आज घटस्थापनेला पहाटे साडे पाचच्या सुमारास मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. महापौर संगीता खोत यांच्याहस्ते दौडीस सुरवात झाली. संभाजी भिडे, नितीन चौगुले आणि शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवादन करून दौड निघाली. "जय भवानी-जय शिवाजी', "हर-हर महादेव' असा जयघोष करत दौड राजवाडा चौक, आमराई, कॉलेज कॉर्नरमार्गे माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिरात आली. मंदिरात पूजा, आरती झाली. श्री. भिडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर दौड मीरा हौसिंग सोसायटी, संभाजी कॉलनी, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नरमार्गे शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आली.

प्रेरणामंत्र होऊन पहिल्या दिवसाच्या दौडीची सांगता झाली. दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी घालून आणि फुलांचा सडा टाकून उत्साहात स्वागत झाले. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com