पावनखिंड परिसरात मद्यपींना चोप (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कोल्हापूर - पावनखिंडीमधील गाडी पार्किंग परिसरात सुमारे 20 ते 25 पर्यटक दारू पीत बसले होते. या मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. तसेच ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात अशी कृत्ये न करण्याचा दमही दिला. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  शिवराष्ट्र संस्थेच्यावतीने 13 ते 15 जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित केली होती.15 जुलै रोजी पावनखिंडीमध्ये या पदभ्रमंती मोहिमेचा समारोप झाला. समारोपानंतर कार्यकर्ते पांढरपाणीच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना पावनखिंडीतील गाडी पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये काही तरूण दारू पीत बसल्याचे निदर्शनास आले. हे सर्व करवीर तालुक्यातील असल्याचे समजते. या वीस ते पंचवीस मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम समज दिली. त्यांच्या गाड्यांची झडती घेऊन दारूच्या बाटल्या बाहेर काढत मद्यपींचा चोप दिला. तसेच ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखावे व अशी कृत्ये न करण्याचा दमही दिला. 

दरम्यान शिवराष्ट्र संस्थेच्यावतीने पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivrashtra organisation hits drunker in Pavankhind