शिवसैनिकांनी नगराध्यक्षांचे दालन फोडले

शेखर जोशी
बुधवार, 6 जून 2018

शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी नगरपालिका विलंब लावत असल्याने शिवसैनिकांनी तोडफोड केली.

तासगाव : शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी नगरपालिका विलंब लावत असल्याने शिवसैनिकांनी तोडफोड केली.

वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या आहेत.. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गेल्या 4 दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत  निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नगरपालिकेने निवेदन स्वीकारले नव्हते.

Web Title: Shivsainiks demolished mayer office